Sunday, November 24, 2024

/

झाडशहापूर ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाकडे ‘हि’ मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : झाड शहापूर गावातील स्मशानभूमी संदर्भातील जागे बद्दल माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली झाडशापुर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर गावातील सर्व्हे क्रमांक ४१/१/१ मधील २० गुंठे जागा हि गेल्या ५० वर्षांपासून ग्रामस्थांकडून वापरण्यात येत आहे. या जागेवर देसूर ग्रामपंचायतीने स्मशानासाठी शेडही उभारली आहे. यासंदर्भात स्मशानासाठी तरतूद केल्याचीही नोंद आहे.

मात्र हि जागा दुसऱ्याच्या नावे असल्याचे सांगत सातत्याने एका ग्रामस्थांकडून वाद निर्माण केला जात आहे.Zad shahapur

यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत असून गेल्या ५० वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरण्यात येणाऱ्या या जमिनीला कायमस्वरूपी स्मशानभूमी म्हणून वापरण्यासाठी शिक्कामोर्तब करून, सरकारी दफ्तारी तशी नोंद करावी, अशी मागणी आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नारायण यळ्ळूरकर, तुकाराम गोरल, पी. बी. चिट्टी, आर. बी. गोरल, मल्लप्पा मर्वे, कृष्णा गोरल आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.