चालकाने बस पुढे नेल्याने खाली पडून युवती जबर जखमी

0
5
Bus accident
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बस थांब्याच्या ठिकाणी सर्व प्रवासी बसमध्ये चढण्यापूर्वीच चालकाने अचानक बस पुढे नेल्यामुळे एक युवती खाली रस्त्यावर पडून जबर जखमी झाल्याची घटना आज सकाळी हुंचेनट्टी क्रॉस येथे घडली.

जखमी युवतीचे नांव प्रीती संतान फिगर (वय 20) असे आहे. हुंचेनट्टी क्रॉस येथील बस थांब्याच्या ठिकाणी बेळगावकडे येण्यासाठी आज सकाळी प्रीती परिवहन मंडळाच्या नावगे बसमध्ये चढत होती.Bus accident

त्यावेळी थांब्यावरील सर्व प्रवासी बसमध्ये चढले आहेत की नाही? याची शहानिशा न करता बस चालकाने अचानक बस पुढे दामटली. परिणामी बसमध्ये चढणारी प्रीती फिगर तोल जाऊन खाली रस्त्यावर कोसळली.

 belgaum

दैव बलवत्तर म्हणून प्रीती बसपासून दूर खाली पडली अन्यथा अनर्थ घडला असता. खाली पडल्याने प्रीतीच्या डाव्या गुडघ्याला आणि हाताच्या मनगटासह डाव्या पायाच्या घोट्याला जबर दुखापत झाली आहे. जखमी प्रीती हिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.