बेळगाव लाईव्ह:हुशार गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या ‘शांताई विद्या आधार’तर्फे शहरातील जीआयटी कॉलेजच्या एका विद्यार्थिनीला शैक्षणिक शुल्कासाठी रु.10,000 ची आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
शैक्षणिक शुल्काची धनादेशाच्या स्वरूपातील मदत संबंधित विद्यार्थिनीकडे सुपूर्द करताना शांताई विद्या आधारचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, विनायक बोंगाळे, गंगाधर पाटील,
कोमल सिरसाट, विद्यार्थ्याचे पालक आणि हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्या आधारच्या कार्यालयाने लोकांना जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे दान करण्याची विनंती केली.
या साहित्याच्या विक्रीतून जमा होणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी, त्यांना आर्थिक ताण न घेता त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करण्यासाठी वापरला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.