बेळगाव लाईव्ह :काल रात्री श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान तिघा युवकांवर चाकू हल्ला होण्यामध्ये झाल्याची घटना कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांची नावे दर्शन पाटील, नितीश पुजारी आणि प्रवीण गुंड्यागोळ अशी आहेत. शहरामध्ये काल श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी डीजे वरून झालेल्या वादाचे पर्यवसान या तिघांवर चाकूने वार करण्यामध्ये झाले.
या हल्ल्यात तिघेही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाला आणि हाताला इजा झाली आहे.
चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर जखमी झालेल्या तीनही युवकांना उपचारासाठी तातडीने सिव्हिल अर्थात बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेण्याद्वारे तपास कार्य हाती घेतली आहे. चाकू हल्ल्याच्या या घटनेप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.