Friday, January 3, 2025

/

नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी स्वतःला बदला -कोळेकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मानसिक त्रास आणि मानसिक स्वास्थ यांची समज करून घेणे ही काळाची गरज आहे. यासाठी संस्कृती एजुकेअर गेले 8 वर्ष पासुन प्रयत्न करत आहे. कोणावर विसंबून न राहता आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी आपण स्वतःला बदलायचे आहे, असे मत संस्कृती एज्युकेअर संस्थेचे संस्थापक व समुपदेशक तेजस कोळेकर यांनी व्यक्त केले.

पंचवटी प्लाझा, टिळकवाडी येथील संस्कृती एज्युकेअर संस्थेच्या सभागृहामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘द हॅपी माईंड’ या पालकांसाठीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आपल्या मनातील नकारात्मक विचार बाजूला कसे काढायचे हे समजत नाही. कोणीतरी येईल व माझे सांत्वन करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. यासाठी आपण स्वतःला बदलायचे आहे. अन्यथा मनात येणारे नकारात्मक विचार बंद न होता वाढत जातील. आपण आपल्या मेंदूची रचना समजून घेतली तर हे लक्षात येईल की आपल्या सर्व हालचाली व वर्तन मेंदू नियंत्रित करतो.

सतत विचार करण्याची सवय आपल्याला असते. त्याविरुद्ध ऐकणे किंवा कृती करणे आपल्याला पटत नाही आणि जमतही नाही. आपल्या प्रत्येक कृती मागे एक कारण असतेच ते शोधल्यास आपल्याला राग येणे थांबू शकते. मानसिक त्रास व स्वास्थ्याची माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे.

लोक निष्कारण आपले स्वास्थ्य आणि समाधान हरवत आहेत. त्यापासून दिलासा मिळावा या हेतूने संस्कृती एज्युकेअर गेल्या 8 वर्ष पासून कार्य करत आहे. केवळ पैसा व नांव महत्त्वाचे नसून नाती, भावना सुद्धा महत्त्वाच्या आहेत.Tejas kolekar

आपण आपल्यात बदल केला तरच स्वतः समाधानी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. लोकाना मानसिक त्रास व स्वास्थ्य याची पूर्ण कल्पना देऊन त्यांना पुढच्या आयुष्याचा ध्येय शोधुन जगण्यास प्रेरित करत आहे. असे कार्यक्रम वारंवार आयोजीत करून आपण स्वतःला व इतरांना ह्या गोष्टींचे व्यवस्थीत मार्गदर्शन करू शकतो. जेणेकरून आजची अनुभवी पिढी उद्याच्या भावी पिढीला मार्गदर्शन करून त्यांना मानसिकरीत्या कणखर बनवू शकेल.

जीवनात यशस्वी होण्यासाठी नुसता शाळेचा अभ्यास पुरेसा नाही. मानसिक स्वास्थ्य हा विषय खूप खोल आणि महत्वाचा आहे. आजच्या जिवनशैलीमुळे प्रत्येक माणूस ताण -तणावात राहतो.

तर एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल असे वाटत असेल तर तिच्याशी संवाद साधा किंवा समुपदेशक लोकांशी या विषयावर चर्चा करा, उपाय नक्की सापडेल, असे मार्गदर्शनपर विचार संस्कृती एजुकेअरचे संस्थापक व समुपदेशक तेजस कोळेकर यांनी व्यक्त केले. कार्यशाळेस बहुसंख्या पालक विशेष करून गृहिणी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.