बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग हा आपल्या नवनवीन उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असतो. विभागाने आपल्या अभ्यासक्रमांमध्ये पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर नवीन युगासाठी गरजेचे असलेले रोजगारक्षम पेपर अभ्यासक्रमात अंतर्भूत केले असून विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
मराठी विभागात प्रवेश घेण्यासाठी https//uucms.karnatak.gov.in या लिंक वर जाऊन ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करता येईल एम. ए.ला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही पदवीचा (बीए बीकॉम बीएससी बीबीए बीसीए)विद्यार्थी चाळीस टक्के घेऊन उत्तीर्ण झालेला असेल तर तो प्रवेश घेण्यास पात्र आहे. सायबर सेंटर मध्ये फॉर्म भरल्यास सोपे जाईल.
फॉर्म भरताना दहावी-बारावी डिग्रीचे सहा सेमिस्टर चे मार्कलिस्ट,आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, सध्याच्या तारखेचे कास्ट-इन्कम सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे दोन फोटो या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर हार्ड कॉपी मराठी विभागाला जमा करायची आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास राघवेंद्र दंडगल 8867224252 यांच्याशी संपर्क साधावा. विभागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने अगदी माफक फी आकारण्याचे ठरवले आहे.
प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास वरील नंबर वर फोन केल्यास तुम्हाला त्या प्रक्रियेचा व्हिडिओ पाठवला जाईल प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 8- 10- 24 ही आहे असून 220 रुपये अर्जाचे शुल्क आहेत. इच्छूकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.