बेळगाव लाईव्ह:राणी चन्नम्मा विद्यापीठाच्यावतीने येत्या दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षांची पुढील नवी तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयू) मूल्यमापन विभागाच्या कुलसचिवांनी एका परिपत्रकाद्वारे दि. 29 सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा होणार असल्यामुळे पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले आहे.
चन्नम्मा विद्यापीठाच्या बीए चौथ्या व सहाव्या सेमिस्टरसाठी 29 सप्टेंबरला परीक्षा होणार होती. यापैकी
बीएच्या सहाव्या सेमिस्टरसाठी ‘महिला हक्क शिक्षण’, तर चौथ्या सेमिस्टरसाठी ‘संशोधन व विमर्ष’ या विषयावरील परीक्षा घेतली जाणार होती. मात्र आता या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.