बेळगाव लाईव्ह:शेवटच्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने सोमवारी दिवसभर उघडीप पडली असली तरी सायंकाळी मात्र बेळगाव शहर परिसरात दोन तास जोरदार पाऊस पडला त्यामुळे पुन्हा एकदा शहर परिसरात सर्वत्र पाणी पाणी झाले होते.
पावसाळ्याच्या गेल्या तीन महिन्यात जून वगळता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बेळगाव शहर -तालुका आणि खानापूर तालुक्यात सर्वसामान्य सरासरीपेक्षा जादा पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात बेळगाव शहर -तालुक्यात 307.2 मि.मी. आणि खानापूर तालुक्यात 551.6 मि.मी. इतका पाऊस झाला असून जो सर्वसामान्य पावसापेक्षा अनुक्रमे 34.2 मि.मी. व 139.6 मि.मी. इतका जास्त आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील चिक्कोडी वगळता सर्व पर्जन्यमापन केंद्रांच्या ठिकाणी सरासरीपेक्षा जादा पाऊस नोंद झाला आहे.
बेळगाव शहर तालुक्यात गेल्या जून महिन्यात सर्वसामान्य 240.0 मि.मी. पावसाच्या तुलनेत अवघा 9.6 मि.मी. पाऊस झाला होता. त्या उलट जुलै महिन्यात मुसळधार पावसाने बेळगाव शहर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढत 754.7 मि.मी. इतकी हजेरी लावली जी या महिन्यातील सर्वसामान्य सरासरीपेक्षा 299.7 मि.मी. इतकी जास्त होती. या महिन्यात खानापूर तालुक्यात तर पावसाने कहरच केला. या ठिकाणी जुलैमध्ये सरासरीपेक्षा 519.4 मि.मी. जास्त म्हणजे तब्बल 1275.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. एकंदर जून महिन्यात संपूर्ण जिल्ह्याला चिंतेत टाकणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावून दिलासा दिला.
बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी नोंद झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी टक्क्यांमध्ये (अनुक्रमे तालुका पर्जन्यमापन केंद्र, जून मधील सर्वसामान्य पाऊस, जून मधील प्रत्यक्ष पाऊस, जुलै मधील सर्वसामान्य पाऊस, जुलै मधील प्रत्यक्ष पाऊस, ऑगस्ट मधील सर्वसामान्य पाऊस, ऑगस्ट मधील प्रत्यक्ष पाऊस यानुसार) खालील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : 78.0, 0.0, 65, 82.6, 53.0, 101.8. बैलहोंगल आयबी : 89.0, 0.8, 129, 214.0, 83.0, 104.8. बेळगाव आयबी : 240.0, 9.6, 455, 754.7, 273.0, 307.2, चिक्कोडी : 86.0, 2.5, 134, 309.9, 97.0, 77.1. गोकाक : 69.0, 10.3, 68, 125.7, 52.0, 56.8. हुक्केरी एसएफ : 102.0, 1.8, 150, 210.0, 89.0, 132.3. कागवाड (शेडबाळ) : 102.5, 0.0, 68.5, 183.1, 66.1, 30.6.
खानापूर : 376.0, 12.0, 756, 1275.4, 412.0, 551.6. कित्तूर: 201.2, 2.6, 270, 565.0, 185.0, 211.5. मुडलगी : 53.2, 2.1, 67, 75.1, 57.3, 70.6. निपाणी आयबी : 79.1, 0.0, 201.8, 439.6, 154.3, 169.4. रायबाग : 72.0, 0.5, 74, 99.5, 54.0, 129.1. रामदुर्ग : 68.0, 0.0, 64, 69.5, 64.0, 67.6. सौंदत्ती : 87.0, 0.0, 76, 147.4, 60.0, 92.4.