Monday, November 18, 2024

/

मद्रास रेजिमेंटचा विशेष खेळाडू बनलेल्याचे अभिनंदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:राष्ट्रीय स्तरावर मद्रास रेजिमेंट वेलिंग्टनच्या लष्करी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात खास खेळाडू म्हणून अभिनंदन निवड झालेल्या कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लाप्पा बुरुड याचे अभिनंदन करून त्याला क्रीडा साहित्याची भेट देण्याबरोबरच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी, बिजगर्णी येथील चव्हाट गल्लीतील यल्लप्पा बुरुड यांचा मुलगा प्रेम याची वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या (एमआरसी) प्रतिष्ठित आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी (एबीएससी) मध्ये ॲथलेटिक्स शाखेत निवड झाली आहे.

तो येत्या 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता केंद्रात रूजू देणार आहे. प्रेम बुरुड याच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल आज गुरुवारी सकाळी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या कार्यालयात वैयक्तिकरित्या प्रेमला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

या खेरीज प्रोत्साहनाचे प्रतीक म्हणून रोशन यांनी एक संपूर्ण स्पोर्ट्स किट प्रेमला भेट दिले. ज्यामध्ये ब्रँडेड स्पोर्ट्स शूज, काळे शूज, ट्रॅकसूट, मोजे, शॉर्ट्स, एक बनियान आणि एक एज्युकेशन किट समाविष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेम बुरुड याचे अभिनंदन केले त्यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष दरेकर यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती.Sports quota

एफएफसीचे सदस्य सोहम अणवेकर यांनी प्रेमचा प्रवास खर्च भरून काढण्यासाठी त्याच्या पालकांना रु. 5,000 ची देणगी दिली आणि ते प्रेम सोबत एबीएससी एमआरसीपर्यंत जाऊ शकतील याची व्यवस्था केली.

फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम ज्यांनी प्रेम बुरुड याला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यात एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर, विशाखापट्टणम येथील रामा कृष्णा मेडिडा, चार्टर्ड अकाउंटंट उदयरवी येलीगर, जितेंद्र लोहार, निवृत्त शिक्षक वाय.पी. नाईक, अवधूत तुडवेकर, स्वयं पाटील, इंद्रधनुष्य कलेक्शनचे मालक सुनील धोंगडी, प्रेमचे प्रशिक्षक एल.जी. कोळेकर, सौरभ सावंत, ॲड. नामदेव मोरे, मनोहर मोरे व पांडुरंग नाईक यांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.