बेळगाव लाईव्ह :रामलिंग गल्ली, जुने बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या यंदाच्या 25 व्या वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अमर बाळेकुंद्री यांनी प्रायोजित केलेल्या भव्य सोलो डान्स, ग्रुप डान्स स्पर्धेसह उत्कृष्ट सार्वजनिक श्री गणेश मूर्ती आणि रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
रामलिंग गल्ली, जुने बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाला यंदा 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहापूर, खासबाग, वडगाव, जुने बेळगाव मर्यादित उत्कृष्ट सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा, बाप्पाच्या आगमन सोहळ्याची रिल्स व्हिडिओ स्पर्धा सोलो डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्ते अमर बाळेकुंद्री यांनी पुरस्कृत केलेल्या या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ काल सोमवारी सायंकाळी रामलिंग गल्ली येथील मंडळाच्या मंडपात आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धांचे पुरस्कर्ते अमर बाळेकुंद्री, तुळशीदास जोशी, मनोहर होसुरकर, संतोष शिवणगेकर, बाबुराव टपाले, वामन जाधव, सुप्रिया चव्हाण, अलका बाळेकुंद्री, आशा सुनील पाटील, सुमन टपाले, व विद्या पाटील हे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक श्री गणेश मूर्ती, सोलो डान्स, ग्रुप डान्स, रिल्स व्हिडिओ आणि रांगोळी स्पर्धा या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. ग्रुप डान्स स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या समूहांना अनुक्रमे रु. 21,000 15,000 व 10,000 तर सोलो डान्स स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. 15,000, 10,000 व 7500 असे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. राजू पाटील यांनी करून शेवटी सर्वांचे आभार मानले. उपरोक्त स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुशांत बेर्जे आशिष पाटील सागर जाधव व प्रज्योत शिंदोळकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी व गल्लीतील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
वरील स्पर्धांचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे. उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती स्पर्धा : 1) पाटील गल्ली यरमाळ रोड, बालगणेश -मूर्तिकार एम जी पाटील, 2) तेग्गीन गल्ली, पर्यावरण -मूर्तिकार सिद्राय लोहार, 3) बँक ऑफ इंडिया कॉर्नर शहापूर. उत्तेजनार्थ : पवार गल्ली शहापूर -राजहंस गणेश, भारतनगर 4था क्रॉस -नरसिंह अवतार, गुरुदेव गल्ली जुने बेळगाव -सिंहासनारूढ गणेश, मरगाई गल्ली जुने बेळगाव -वीणाधारी गणेश, रयत गल्ली वडगाव -आसनस्थ गणेश, मिरापूर गल्ली शहापूर -मूषकारूढ गणेश, खासबागचा राजा -सिंहासनारूढ गणेश, बिच्चू गल्ली शहापूर -बाल गणेश डमरू, बसवन गल्ली शहापूर -पंचमुखी गणेश, वड्डर गल्ली वडगाव -राम अवतार, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ -सरस्वती अवतार.
रांगोळी स्पर्धा : 1) निवेदिता पाटील, 2) हर्षली पाटील, 3) राजश्री तारिहाळकर. उत्तेजनार्थ -तेजश्री भोजे, स्नेहल चव्हाण, श्रेया धामणकर. रिल्स व्हिडिओ स्पर्धा : 1) समर्थ माचीगडकर, 2) श्लोक चव्हाण, 3) समर्थ कुडची व सागर जाधव. सोलो डान्स स्पर्धा : 1) रिषभ गोडची, 2) प्रीतम कोंगेरी व साई गौंडाडकर 3) मनस्वी माळगी.
ग्रुप डान्स स्पर्धा : 1) लकी डान्स ग्रुप, 2) व्ही. बी. डान्स ग्रुप व बीट ब्रेकर्स, 3) एक्सट्रीक्स ग्रुप. उत्कृष्ट चित्रासाठी विशेष बक्षीस -इंदर मेवाड.