बेळगाव लाईव्ह : केंद्रातील सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आणि राज्यांच्या घटनात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेसाठी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत राज्यांच्या अस्तित्व, हक्क आणि समभागांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय मोहीम आखण्यात आली आहे.
राज्यपालांना हाताशी धरून अधिकार आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जन आंदोलन उभारण्यासाठी बंगळुरूमध्ये १४ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अरविंद दळवाई यांनी दिली.
राज्यांमध्ये रुजलेल्या मजबूत नेत्यांना कमकुवत करण्याचे षडयंत्र, प्रसारमाध्यमांचे बांधलेले हात, आर्थिकदृष्ट्या विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना देण्यात येणारी वागणूक , भ्रष्टाचार, पेहराव, भाषा, संस्कृती, चालीरीती यावर लादण्यात येणारी बंधने
आणि वाढत चाललेला उन्माद अशी परिस्थिती केंद्रात उद्भवली असून केंद्र सरकारच्या या कुटील प्रयत्नाविरोधात आवाज उठविण्यासाठी हि मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत णज दिग्गज नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती अरविंद दळवाई यांनी दिली.