बेळगाव लाईव्ह : लोकायुक्त पोलिसांनी आज मुडा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) मधील कथित घोटाळ्याची लोकायुक्त चौकशी सुरू करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
म्हैसूर लोकायुक्तमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची आरोपी क्रमांक 1 (A1), त्यांची पत्नी पार्वती यांची आरोपी क्रमांक 2 (A2) मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांची आरोपी क्रमांक 3 (A3) म्हणून नावे नमूद करण्यात आली आहेत.
गेल्या बुधवारी, येथील विशेष न्यायालयाने मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची पत्नी बी. एम. पार्वती यांना सुमारे चौदा जागा वाटपातील कथित अनियमिततेबद्दल सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशी करण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली मंजुरी कायम ठेवली.
विशेष न्यायालयाने आपल्या बुधवारच्या आदेशात, आरटीआय कार्यकर्ता स्नेहमयी कृष्णा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 156 (3) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त चौकशीचे निर्देश दिले, 24 डिसेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही विशेष न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.