बेळगाव लाईव्ह :कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीद्वारे (सीआयआय) नुकत्याच आयोजित “इनोव्हर्ज” कार्यक्रमादरम्यान कर्नाटकचे बृहत आणि मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी घोषित केल्यानुसार आता बेळगाव मेड-टेक क्षेत्रावर केंद्रित नवीन सॉफ्टवेअर पार्क विकसित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
बेळगाव येथील या नियोजित तंत्रज्ञान केंद्रासाठी (टेक हब) योग्य जागा शोधण्याचे काम अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले आहे. यावरून या प्रदेशात नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करते, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
याशिवाय राज्य सरकार संपूर्ण कर्नाटकात औद्योगिक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही गुंतवणूक नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी आणि विद्यमान क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी,
तसेच अनेक क्षेत्रांतील समर्पित पाणी पुरवठ्याची कमतरता दूर करण्याच्या दिशेने वळवली जाईल. ही आव्हाने पूर्ण होतील.
याची खात्री करण्यासाठी सरकार सध्या वित्त विभागाशी चर्चा करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा लाभ घेण्यासाठी बेळगाव सज्ज झाले आहे.