बेळगाव लाईव्ह : सेंट्रींग काम करताना करंट लागून होनगा येथील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील जुमनाळ येथे घडली आहे.
मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत परशराम कल्लाप्पा हुंदरे वय 46 रा. होनगा असे या घटनेत मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
होनग्या जवळील जुमनाळ येथे घराचे सेंट्रींग काम करत असताना लोखंडी बारचा विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी परशराम यांच्या 14 वर्षीय मुलगी प्रणाली हिचा देखील डेंग्यूने मृत्यू झाला होता दोन महिन्यानंतर आता वडिलांचा मृत्यू झाला आहे. परशराम याचा पश्चात पत्नी आणि दहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
केवळ दोन महिन्याच्या आत एकाच कुटुंबातील दोघांचा अचानक मृत्यू झाल्याने हुंदरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे त्यामुळे होनगा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत काकती पोलिसात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.