Tuesday, September 17, 2024

/

शिवसेनेतर्फे शहर मर्यादित सुंदर श्रीमूर्ती स्पर्धा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्यावतीने यावर्षी देखील ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2024’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा शहर मर्यादित असून ती बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण अशा दोन विभागात घेतली जाईल. सदर स्पर्धेअंतर्गत श्री गणेश मूर्ती आणि मंडप परिसर स्वच्छता अशा दोन्ही गोष्टींचे निरीक्षण होणार आहे.Ganesh advt 2024

स्पर्धेच्या दोन्ही विभागांसाठी प्रत्येकी पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्री गणेश प्रतिष्ठापनेपासून येत्या दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत श्री गणेश मूर्तींचे निरीक्षण केले जाईल.Ganesh advt 2024

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 15 सप्टेंबर रोजी होणार असून ज्या मंडळाच्या मूर्तीचा प्रथम क्रमांक येईल त्यांना त्यांच्याच मंडपाच्या ठिकाणी बक्षीस वितरण केले जाईल.

तसेच श्रीमूर्ती विजेत्या मंडळांना फोनद्वारे माहिती दिली जाईल, असे शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू शंकर केरवाडकर यांनी कळविले आहे.Ganesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.