Tuesday, September 17, 2024

/

गणेशोत्सव:धोकादायक विद्युत तारा हटवल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील हेस्कॉम उपविभाग-3 परिसरात मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटविणे तसेच रस्त्यांची तात्पुरती उंची वाढविण्याचे काम करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दिली.

खोदलेले खड्डे आणि मिरवणूक मार्गांची कसून तपासणी करून सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यात येत असून हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपविभागांतर्गत 74 गणेश पेंडल स्थानकांना भेटी देऊन वीज परिवर्तकांची पाहणी केली आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची देखभाल व दुरुस्ती केली जात असून वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या आहेत.

धोकादायक ठिकाणी असलेल्या अतिदाबाच्या विद्युत वाहिन्या हटवून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच हेस्कॉम (ऑपरेशन ॲण्ड मेंटेनन्स) शहर उपविभाग-3 अंतर्गत सहाय्यक अभियंता पदावर सर्वत्र सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा धोका होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, धोकादायक विद्युत तारा, खांब किंवा ट्रान्सफॉर्मर आढळून आल्यास जनतेने तातडीने हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ganesh advt 2024

विद्युत समस्येशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास जनतेने अधिकाऱ्यांना ज्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहGanesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.