बेळगाव लाईव्ह :पुणे येथून बेळगाव मार्गे हुबळीपर्यंतच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ आज सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे खात्याने बेळगाव ते पुणे आणि पुन्हा परतीचा प्रवास अशा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेचा तपशील जाहीर केला आहे.
बेळगाव ते पुणे (पुन्हा माघारी) अशा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा तपशील पुढील प्रमाणे आहे. बेळगाव ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस क्र. 20669 आपला प्रवास 8 तास 30 मिनिटांत पूर्ण करेल आणि ही रेल्वे सेवा दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी उपलब्ध असेल. रेल्वे क्र. 20669 बेळगाव येथून सकाळी 7 वाजता प्रस्थान करेल आणि दुपारी एक 30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या रेल्वेचे अन्नासह मूळ भाडे -सीसी रु.1295, ईसी रु.2290. बिगर अन्नासह मूळ भाडे -सीसी रु.0955, ईसी रु.1890.
पुणे ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे क्र. 20670 आपला प्रवास 6 तास 20 मिनिटांत पूर्ण करेल आणि ही रेल्वे सेवा दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध असेल. रेल्वे क्र. 20670 पुणे येथून दुपारी 2:15 वाजता प्रस्थान करेल आणि रात्री 8:35 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
या रेल्वेचे अन्नासह मूळ भाडे -सीसी रु.1240, ईसी रु.2240. बिगर अन्नासह मूळ भाडे -सीसी रु.0955, ईसी रु.1890. सदर वेळापत्रक आणि प्रवास भाड्यामध्ये कोणतेही बदल शक्य आहेत.
कृपया बुकींग करण्यापूर्वी तपासा नमूद केलेल्या भाड्यांमध्ये सुविधा शुल्क आणि जीएसटी समाविष्ट नाही, असे रेल्वे खात्याने कळविले आहे.