बेळगाव लाईव्ह: मॉर्निंग वॉकला युवक बुलेरोने दिलेल्या धडकेत ठार झाला आहे बेळगाव शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
श्रीधर पवार वय 42 रा. संतसेना रोड बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार गोवा वेस कडून बँक ऑफ इंडिया कडे महात्मा फुले रोड वरून जाणाऱ्या बुलेरो गाडीने श्रीधर यांना ठोकर दिली त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
श्रीधर हे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला गेले होते त्यावेळी रस्ता ओलांडतेवेळी दुभाजका कडे थांबले होते त्यावेळीनियंत्रण सुटलेल्या बुलेरो गाडीने दुभाजकाला आणि रस्ता क्रॉसिंग साठी थांबलेल्या श्रीधर यांना जोराची धडक दिली त्यात ते गंभीर रित्या जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहिती नुसार बोलेरो गाडीचे नियंत्रण सुटल्याने त्याने हा अपघात केला आहे त्यात मॉर्निंग वाकर्सला जीव गमवावा लागला आहे. रहदारी दक्षिण पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मयत श्रीधर हे एलेक्ट्रीशियन कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.