Sunday, December 22, 2024

/

रक्तदानाचे मॅरेथॉन… फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात रक्तदान करण्यास आघाडीवर असलेल्या फेसबुक फ्रेंड्स या संघटनेने रविवारी तब्बल तीन रुग्णांना 25 युनिट रक्त उपलब्ध करून देत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.

बेळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांना वेळेत उपचार देऊन त्यांना मदत करण्याचे काम रविवारी करण्यात आले. त्यामध्ये राजेश थब्बे यांना 12 युनिट अभिनंदन रोकडे यांना 8 युनिट 3 एसडीपी यासह आनंद पाटील यांना 2 युनिट रक्त दिले.

फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर यांनी या मोहिमेत भाग घेतला होता. सदर रक्त मिळवण्यासाठी के एल ई हॉस्पिटल ब्लड बँक प्रमुख श्रीकांत विरगे आणि डॉ.माधव प्रभू यांचे सहकार्य लाभले. कोल्हापूरचे झी २४ तासचे मुख्य प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.Fb friends circle

बेळगाव शहरात सध्या सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले संतोष दरेकर आणि अवधूत तुडेकर, पद्म प्रसाद हुली यांच्या माध्यमातून झालेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.
कुणाला रक्त पाहिजे असल्यास संतोष दरेकर 9986809825 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.