बेळगाव लाईव्ह:बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेतील (बीम्स) वैद्यकीय विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवरील पी. जी. नीट परीक्षेमध्ये देशात 9 वा क्रमांक पटकावण्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर बीम्सच्या नावलौकिकात भर घातली आहे.
बिम्समधील एम.बी.बी.एस.चा विद्यार्थी असणाऱ्या डॉ. शरणप्प शिनप्पणावर याने पीजी नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवण्याद्वारे महत्त्वाचा मैलाचा दगड घातला आहे त्याचबरोबर बीम्सचा नावलौकिकही वाढविला आहे. बीम्स संस्थेचे वैद्यकीय शिक्षण स्थानिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावत असते.
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव मधील वैद्यकीय शिक्षण उन्नत करण्यात बीम्सचा सिंहाचा वाटा आहे. याचा पुरावा म्हणजे बिम्स मधील एमबीबीएसचा विद्यार्थी डाॅ. शरणप्प शिनप्पण्णावर याने पीजी नीट परीक्षेत देशात मिळविलेला नववा क्रमांक हा होय.
याद्वारे डॉ. शरणप्पा याने राष्ट्रीय स्तरावर आपल्या संस्थेचा नावलौकिक आणखी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असून साऱ्या देशाचे लक्ष बीम्सकडे वेधले आहे.
याबद्दल बीम्सचे व्यवस्थापन आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डाॅ. शरणप्प शिनप्पण्णावर याचे खास अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.