बेळगाव लाईव्ह : बीम्समध्ये एमबीबीएस शाखेत अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या झोया तेबाला या विद्यार्थिनीने कस्तुरबा मेडिकल कॉलेजद्वारे आयोजित वेदम – प्री-ग्रॅज्युएट मेडिकल कॉन्फरन्समध्ये ओरल रिसर्च पेपर सादरीकरण स्पर्धेत तिसरे पारितोषिक पटकावले आहे.
मणिपाल येथे नुकत्याच झालेल्या मौखिक निबंध स्पर्धेमध्ये “टर्शीयरी केअर हॉस्पिटलमधील बालरोग रूग्णांमध्ये डेंग्यू तापाचे प्लेटलेट इंडेक्सेसचे नातेसंबंध आणि रोगविषयक प्रोफाइल” – एक निरीक्षणात्मक अभ्यास – शीर्षकाचा एक पेपर सादर केला होता.
झोया तेबाला या विद्यार्थिनीने मिळविलेल्या यशाबद्दल बीम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, डॉ. अश्विनी चिंगळे (सहाय्यक प्राध्यापक, सामुदायिक औषध विभाग),
डॉ. चिन्मयी जोशी (सहायक प्राध्यापक, बालरोग विभाग), डॉ. आर.जी.विवेकी (कम्युनिटी मेडिकल विभागाचे प्रमुख), बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश पाटील आणि पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रेखा हरविहा तसेच बीम्स शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे या यशाबद्दल अभिनंदन केले.