Wednesday, January 15, 2025

/

शहर उपनगरात अपूर्व उत्साहात बाप्पाचे स्वागत; भक्तीभावाने प्रतिष्ठापना

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज शनिवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांसह बेळगाव शहर उपनगरांमधील गणेश भक्तांकडून घरोघरी श्री गणेशाचे जल्लोषी स्वागत करून अत्यंत भक्तीभावाने त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच घरोघरी तरुणाईने गेल्या 8 -15 दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची पुर्वतयारी सुरू केली होती. त्यांच्या सजावटीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाजारपेठही सजावटीच्या साहित्याने सजली होती.

विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्यांसह बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री सार्वजनिक मंडळामध्ये आणि घरातही रात्रीपर्यंत आरास करण्याचे काम सुरू होते. श्री गणेश चतुर्थी दिवशी आज भल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात वाजत गाजत श्रीमूर्ती आणून सार्वजनिक मंडपांसह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.Ganesh

गुरुप्रसाद कॉलनी, चन्नम्मानगर, जाधवनगर, कुवेंपूनगर, माळमारुती विस्तारित प्रदेश आदी मुख्य शहरापासून दूरवर असलेल्या उपनगरातील गणेशभक्त शहरातील मूर्तिकाराकडून घेतलेल्या श्रीमूर्ती आपल्या कार गाडीमधून टाळ वाजवत, गणरायाची गाणी लावून बापाचा जयजयकार करत मोठ्या उत्साहाने आपापल्या घरी नेताना दिसत होते. कांही गणेश भक्त आपल्या दुचाकीवरून श्रीमूर्ती नेत होते.Ganesh advt 2024

त्याचप्रमाणे कांही हौशी गणेश भक्तांनी श्रीमूर्ती आणताना वाजंत्री ठेवले होते. मूर्तिकारांची कार्यशाळा आणि मूर्ती विक्रीच्या ठिकाणच्या रस्त्यावर आज दिवसभर विशेष करून सकाळी श्रीमूर्ती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी पहावयास मिळत होती. फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पाला प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाताना बालगोपाळ आणि तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता.Ganesh advt 2024

गेल्या कांही दिवसांपासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपलेल्या शहर उपनगरवासियांसह ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी आज श्री गणेश चतुर्थी दिवशी बाप्पाचे उत्स्फूर्त जल्लोषी स्वागत करून विधिवत प्रतिष्ठापना केली. घराघरात आणि गल्लोगल्लीमध्ये आज पहाटेपासून श्री गणरायाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळत होती.

घरोघरी श्री मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती होऊन मोदक किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. घरातील श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा आटोपून दुपारनंतर तरुणाई व बालचमू सार्वजनिक मंडळाचा गणपती आणण्यासाठी किंवा पूर्वी जमलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडत होते. शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेश मूर्ती यापूर्वीच मंडपात आणून ठेवण्यात आल्या असल्या तरी उर्वरित सार्वजनिक श्रीमूर्ती आज सायंकाळी ढोल ताशांचा गजरासह फटाक्यांच्या आतषबाजीत मंडपात आणून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.Ganesh advt 2024

श्री मूर्ती आणताना कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. श्री गणेश चतुर्थी निमित्त आज रात्री उशिरापर्यंत शहर उपनगरातील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या मंडपामध्ये प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. दरम्यान श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.Ganesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.