बेळगाव लाईव्ह : कोंडुस्कोप्प गावातील कम्युनिटी हॉलच्या (समुदाय भवन) जागेसाठी बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावात ग्रामपंचायत उपाध्यक्षांसह चौघांवर गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात बस्तवाड ग्रामपंचायत उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी हिरेबागेवाडी सीपीआय, पीएसआय यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गावातील लोकांच्या संमतीने पंचायतीची जमीन विठ्ठल सांबरेकर यांनी मिळविली असून याचा राग मनात ठेवून काही विरोधी पार्टीतील नागरिकांनी हा हल्ला केला आहे.
इमारतीचे बांधकाम सुरू असताना याच गावातील पुंडलीक कुडचीकर, भीमा देमण्णावर आणि नागप्पा वलके यांनी त्यांच्यावर विटांनी हल्ला केला. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.