बेळगाव लाईव्ह: केवळ अन्यायावर वाचा फोडणाऱ्या, आणि समाजातील चांगल्या गोष्टींच्या बातम्या देऊन पत्रकारिता करण्याबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक सकारात्मक बाबीला प्रोत्साहन देणे तितकेच गरजेचे आहे. बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून,सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याला बक्षिसे,मंडळांना पुरस्कार आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान करत विधायक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी उचललेले छोटे पाऊल आहे असे मत बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी व्यक्त केले.
शनिवारी नरगुंदकर भावे चौकातील गणेश मंडळात गणेश मंडळांना, घरगुती देखव्याना अनेक क्षेत्रात कामगिरी बजावलेल्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रोबेशनरी आय ए एस अधिकारी दिनेश कुमार मीना, नरगुंदकर भावे चौकातील गणेश मंडळाचे सचिव राजेंद्र हंडे, मंडळाचे खजिनदार महेश कुगजी उपस्थित होते.
जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले समाजाने सामाजिक भान राखत पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजेत. पर्यावरणाला हानिकारक असणारे घटक प्लास्टिक प्लास्टर आणि थार्मोकॉलचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. पाणी माती हवा याची जपणूक केली पाहिजेत त्याच बरोबर समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या लोकांचे सामाजिक जबाबदारी म्हणून कौतुक केले पाहिजे.
यंदा मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे.
इको फ्रेंडली श्रीमूर्ती बनवलेले माळी गल्ली आणि नानावाडीचे गणेश मंडळ यंदाचे आदर्श गणेश मंडळ पुरस्काराचे मानकरी ठरले तर प्रोत्साहन पुरस्कार
युवा गणेश मूर्तिकार 2024 नम्रता श्रेयकर वडगाव,
सुशांत लोहार हलगा,युवा सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार 2024 अवधूत तुडवेकर आणि सौरभ सावंत,ध्येयपूर्ती पुरस्कार 2024: जीवनू शहापूरकर (C.A. परीक्षा यश)शौर्य पुरस्कार 2024: स्फुर्ती सव्वाशेरी ( तिघांचे वाचवले जीव) यांना प्रदान करण्यात आला.
धाडस पुरस्कार 2024: अशोक कोरवी ( माजी सैनिक, नानावाडी येथे पुरात नाल्यात उतरून पाण्याचा केला निचरा)सामूहिक समाजभान पुरस्कार 2024 कै. वनिता पाटील शिक्षण संस्था ट्युशन विद्यार्थी ( झाडाखाली ठेवलेल्या नागांची बनवली इको फ्रेंडली गणेश मूर्ती),बॉडी बिल्डिंग क्षेत्रात योगदान पुरस्कार 2024 : गौरांग गेंजी आणि विद्यादान पुरस्कार 2024 :रवी बेळगुंदकर (AIM Coaching Acadamy) यांना देण्यात आला
आर आय पाटील (चेअरमन मार्कंडेय साखर कारखाना काकती बेळगाव) यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सामाजिक संदेश देणारे देखावे
मंगेश चापगावकर वडगाव : स्पोर्ट्स प्रमोशन देखावा
युवराज भोसले जुने बेळगाव : ग्रामीण भागातील परंपरा जतन करण्याची जनजागृती करणारा इको फ्रेंडली देखावा
जोतिबा हलगेकर मीरापूर गल्ली शहापूर : मराठी शाळा टिकवा जनजागृती देखावा
बाळेकुंद्री परिवार कडोली : स्वतः घरात साकारली इको फ्रेंडली मूर्ती
राहुल सागर बी के कंग्राळी : शेती टिकवा शेतकरी टिकवा जनजागृती
विनोद मेणसे उचगाव : माझं गाव माझी ओळख.. जनजागृती देखावा
प्रज्वल कामती हलगा : शेती टिकवा परंपरा जपा देखावा