बेळगाव लाईव्ह : पूर्व वैमनस्यातून अंगावर कारगाडी घालून खून केलेल्या प्रकरणाचा छडा 24 तासाच्या आत लावण्याची कामगिरी यमकनमर्डी पोलिसांनी केली आहे.यमकनमर्डी पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीना शिताफीने अटक केली आहे अशी माहिती एसपी भीमाशंकर गुळेद यांनी माध्यमांना दिली.
याबाबत समजलेले अधिक माहितीनुसार वैयक्तिक शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल जोत्याप्पा रामगोनट्टी(वय 60) या व्यक्तीच्या अंगावर कार घालून त्यांचा खून करण्यात आला . पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात पाठवला . प्रारंभी हा अपघात असे वाटत होते . मात्र अधिक तपासनानंतर तो खून असल्याचे स्पष्ट झाले. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात ही घटना घडली.
यासंबंधी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी हा अपघात नसून खून असल्याची माहिती दिली . बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी यमकनमर्डी पोलीस ठाण्यांतर्गत होसूर आणि इंगळगी गावादरम्यान दुचाकी आणि इंडिका कार यांच्यात अपघात झाल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे सिद्ध झाले.
या प्रकरणी अवघ्या २४ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात यमकनमर्डी पोलिसांना यश आले आहे. 2 एकर 35 गुंठे जमिनीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणावरून रामगोनट्टी आणि मुस्लिम कुटुंबात वाद झाला होता. तसेच काल होसूरच्या ज्येष्ठांची बोलणी बैठक झाली. मीटिंगवरून परतत असलेल्या विठ्ठल जोत्याप्पा रामागोनट्टी (वय 60) यांना भीमप्पा आणि बाबू जात असलेल्या दुचाकीवर बसवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत विठ्ठल जोत्याप्पा रामागोनट्टी (६०) यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी लाइटनिंग ऑपरेशन करून २४ तासांत रायबागमध्ये कार ताब्यात घेऊन आरोपी लाझमी आणि सद्दामला अटक केली.
पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील यमकनमर्डी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला गजाआड केले.यमकनमर्डी पोलिसांचे बेळगावचे जिल्हा अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.
या प्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.