बेळगाव लाईव्ह : अपघातातील जखमीला तब्बल ४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई आदेश बेळगाव जिल्हा न्यायालयाने दिला आहे . याकामी वकील सुधीर चव्हाण यांनी जखमीला सदर नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
कंग्राळी खुर्द येथील युवक देवराज निलजकर व इतर प्रवासी एका ऑटो रिक्षामधून कडोली हुन बेळगाव कडे प्रवास करत असतेवेळी ते बेळगाव- कडोली रस्त्यावर कडोली गावच्या हद्दीमध्ये बसवाणा मंदीर नजिक चालकाने आपली एक मक्सी कॅब वाहन बेळगावकडून कडोली कडे अतिवेगाने व निष्काळजीपणाने चालवून सदरच्या प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिला.
सदरच्या अपघातामध्ये देवराज निलजकर याच्या डोकिला व शरीराच्या इतर भागाला गंभीर, दुःखापत झाली होती. अपघातानंतर त्याला, विजया हॉस्पिटल बेळगांव येथे दाखल करण्यात आले होते. सदर अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यामध्ये करण्यांत आली होती.
पोलीसांनी सदर अपघाताची सखोल तपास करून सदर मॅक्सीकब वाहन चालकांविरुद्ध दोषारोप दाखल केले होते. सदर अपघातांमध्ये झालेल्या गंभीर दुःखापतीची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी जखमी देवराजे निलजकर यांनी जिल्हा न्यायालयांमध्ये सदरच्या वाहन मालक व विमा कंपनी विरुद्ध दावा दाखल केला होता.
सदर दाव्या – मध्ये जखमीकडून संपूर्ण पुरावे व साक्ष नोंदविण्यात आली होती.
सदर साक्षी पुराव्यांच्या आधारे व त्याची बाजु ऐकुण घेऊन सदरचा दावा मंजूर करुन जखमीला भरपाई म्हणून व्याजासहीत एकूण रु. 46,00,000/- देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला. जखमीच्यावतीने अॅड. सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.