बेळगाव लाईव्ह :श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या आमच्या संस्थेला यंदाच्या 2023 -24 सालच्या 73 व्या आर्थिक वर्षात 61 लाख 57 हजार 085 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून यावर्षी संचालक मंडळांनी सभासदांना शेकडा 13 टक्के लाभांश देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती श्री तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी दिली.
महात्मा फुले रोड, शहापूर येथील श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सभागृहात आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चेअरमन मरगाळे यांनी सांगितले की, यंदाच्या 73 व्या वार्षिक अहवाल साली 20 नवीन सभासद झाल्यामुळे वर्षाखेरीस बँकेची सभासद संख्या 8887 झाली आहे.
बँकेचे भाग भांडवल 3.62 लाखांनी वाढवून ते एकूण 1,43,29,500 रुपये इतके झाले आहे. बँकेकडे 9,00,08, 675 रुपये इतका राखीव व इतर निधी असून 53,77,72,123 रुपये इतक्या ठेवी आहेत. बँकेने 36,26,68,805 इतक्या रुपयांचे कर्ज वितरण केले असून कर्ज वसुली समाधानकारक आहे. आमच्या बँकेकडे खेळते भांडवल 68,14,13,756 रुपयांचे खेळते भांडवल असून 27,60,38,172 रुपयांची गुंतवणूक बँकेने केली आहे. तसेच मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील बँकेला ‘बी’ ऑडिट श्रेणी मिळाली आहे.
मागील वर्षाप्रमाणेच या वर्षाची बँकेची प्रगती पाहून सभासदांना लाभांश वाटप केले जाणार आहे यावर्षी संचालक मंडळाने शेकडा 13 टक्के लाभांश देण्याचे ठरविले आहे. श्री तुकाराम बँकेच्या अनंतशयन गल्ली, बेळगाव येथील शाखेची प्रगती देखील उत्तम असून या शाखेने अहवाल साली 12.02 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे.Tukaram bank
शाखेचे खेळते भांडवल 11.66 कोटी रुपये असून कर्ज वितरण 4.69 कोटी रुपयांचे आहे. सदर शाखेकडे 11 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. आमच्या बँकेने कोर बँकिंग सुविधाही सुरू केली आहे. या अंतर्गत एनईएफटी /आरटीजीएस आणि एसएमएस सेवा तसेच इतर बँकिंग सुविधा बँकेचे सभासद व ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत अशी माहिती देऊन बँकेच्या स्थिर आर्थिक प्रगतीसाठी बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, रिझर्व बँक तसेच सहकारी खात्याचे सर्व अधिकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. या सर्वांसह बँकेचे कायदा सल्लागार, कर्मचारी वर्ग आणि पिग्मी संकलक यांचा मी आभारी आहे, असे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी शेवटी सांगितले.
पत्रकार परिषदेस श्री तुकाराम बँकेचे व्हाईस चेअरमन विजय पाटील संचालक प्रदीप ओऊळकर, राजेंद्र पवार, नारायण पाटील, अनंत जांगळे, राजू मरवे, मोहन कंग्राळकर, मदन बामणे, प्रवीण जाधव, संजय बाळेकुंद्री वंदना धामणेकर, ॲड. पल्लवी सरनोबत, महादेव सोंगाडी, सुनील आनंदाचे आणि बँकेचे सीईओ जनरल मॅनेजर परिंद जाधव आदी उपस्थित होते.