विजेचा खांब पडून तेरा गुरांचा मृत्यू
बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या, जुनी वंटमुरी गावात विद्युत खांब पडल्याने, 13 गुरांचा, मृत्यू झाल्याची घटना, मंगळवारी (दि. 20) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
गावातील तीन लोक एकत्र येऊन गुरे चारायला घेऊन गेले होते. सायंकाळी पाऊस येत असल्याने ते आपली गुरे आपापल्या घरी घेऊन जात होते. दरम्यान, करीकट्टी हाळेवंटमुरी रस्त्याच्या मधोमध असलेला, विजेचा वीद्युत खांब तुटून पडल्याने 13 गुरे जागीच ठार झाली. मुट्टाप्पा हुच्यल्लाप्पा बसरगी, यांच्या 4 गायी, 2 बैल, लक्षकिन अप्पया किलारगी, 1 गाय, 1 म्हैस आणि यल्लवा निंगाप्पा मस्ती, यांच्या 5 गायी जागीच ठार झाल्या. गावचे तलाठी विठल बुकनट्टी, महसूल निरीक्षक सी के कलकंबकर, पीएसआय एस.के. मन्निकेरी, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ मोकाशी, तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मारुती गुटगुड्डी यांनी भेट दिली.