बेळगाव लाईव्ह : हिरेबागेवाडी गावात धाडसी चोरी करण्यात आली असून तब्बल १० लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिरेबागेवाडी येथील पेटे गल्ली येथे गुटखा विक्री करणारा सेल्समन वाहन घेऊन आला होता.
दुकानात गुटखा देऊन परतण्यापूर्वीच त्याच्या वाहनात ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग घेऊन चोराने पोबारा केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरात घरफोडी, दुकाने फोडणे, दुचाकी चोरणे अशा अनेक चोरीच्या घटना घडत असल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याचे निदर्शनात येत असून याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे.