बेळगाव लाईव्ह : काळाम्मा नगर धामणे येथील एका घरात कुलूप तोडून किमती मोबाईल चोरी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे.
गेल्या वर्षभरापासून बेळगाव दक्षिण भागात असणाऱ्या धामणे या गावांमधल्या चोरीच्या घटनावर नियंत्रण आणण्यात ग्रामीण पोलिसांना अपयश आले असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.
मागील महिन्यात ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पथकाने धामणे गावाला भेट देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप कोणत्याही धामणे गावातील चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे अजूनही ग्रामस्थांच्या मनात चोरीच्या घटनांच्या बाबतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अगोदर या गावात चोरीच्या घटना सोबत अनेक अप्रिय घटना घडल्या होत्या. घरासमोर लावलेल्या दुचाकीना आग लावणे याशिवाय गवताच्या गंजा नाग लावणे अशा अनेक घटना घडल्या होत्या.
मंगळवारी दुपारी हेमंत कृष्णा पाटील यांच्या घरी कोणीही नसलेल्या पाहून इलेक्ट्रिक मशीनने लॉक तोडून किमती मोबाईल चोरी केला याशिवाय घरातील साहित्य विस्कटून चोरटे फरार झाले आहेत.
पोलीस आयुक्त मार्टिन यांनी या प्रकरणी लक्ष देऊन धामणे गावातील अप्रिय घटना आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणावे अशी मागणी वाढू लागली आहे.