बेळगाव लाईव्ह:तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी 35 जणांची निवड करण्यात आल्याचा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
तालुका समितीच्या नवीन कार्यकारणी निवडीबाबत चर्चा करण्याबाबत रविवारी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तालुका समितीच्या पुनर्रचनेसाठी 35 गावातून 400 जणांनी कार्यकारणीसाठी नावे दिली आहेत. अद्याप काही गावातून नावे देण्यात आली नाही त्या गावांनी येत्या रविवारपर्यंत कार्यकर्त्यांची नावे कार्यकारिणीसाठी द्यावीत, अशी सूचना केली. प्रत्येक गावात समितीची शाखा निर्माण करावी त्यामुळे समितीची ताकद निर्माण होईल असे मत व्यक्त केले.
ऍड एम जी पाटील यांनी समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी 35 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे यामधून समितीचे नवीन पदाधिकारी निवडले जातील अशी माहिती दिली.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी समितीत माजी आमदार मनोहर किणेकर, लक्ष्मण होनगेकर, आर एम चौगुले, आर के पाटील, ऍड एम जी पाटील, अनिल पाटील, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, आर आय पाटील, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील, यल्लाप्पा रेमानाचे, मनोहर हुंदरे, डी बी पाटील, सुभाष मरुचे, मल्लाप्पा पाटील, बाळू फगरे, नारायण सांगावकर, मल्लाप्पा गुरव, दिपक आमरोळकर, अनिल तुडयेकर, किरण पाटील, शिवाजी जोगानी, कमल मन्नोळकर, वैष्णवी मुळीक, प्रेमा मोरे, महेंद्र जाधव, प्रसाद सडेकर, पियुश हावळ, कृष्णा हुंदरे, अंकुश पाटील, चेतन पाटील, तुळसा पाटील, ऍड राजाभाऊ पाटील, दीपक पावशे यांची नावे आहेत.