बेळगाव लाईव्ह :खराब झाल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या सुळगा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
खड्डे पडून वाताहत झालेल्या सुळगा रस्त्यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद गेल्या शनिवारी या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली होती.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खराब झालेल्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यासाठी आज गुरुवारी सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील जुने डांबरीकरण काढून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते.
त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूनेच वाहतूक सुरू होती. दुरुस्तीच्या कामामुळे सुळगा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असली तरी लवकरच हा रस्ता खड्डे विरहित चांगला होणार असल्यामुळे वाहन चालकात समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
मागील बेळगावच्या ग्रामीण भागातील या रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकातून असं समाधान व्यक्त करण्यात येत होते जोरदार टीका केली जात होती त्यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी रात्रीच्या वेळी पाहणे केली होती आणि अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याचा सूचना दिल्या होत्या त्यानंतर आज रस्त्याच्या दुरुस्ती कामकाजाला सुरुवात झाली आहे.