Tuesday, December 31, 2024

/

क्रांतिवीर संगोळी रायन्ना ब्रिटिशांसाठी सिंहस्वप्न : मुख्यमंत्री

 belgaum

बेळगाव लाईव्ह : क्रांतिवीर संगोळी रायन्ना हे ब्रिटिशांसाठी सिंहस्वप्न होते. संगोळी रायन्ना अधिक काळ जगले असते तर ब्रिटिशांची नजर कित्तूरवर पडू शकली नसती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी व्यक्त केली. गोकाक येथील काखीगुड्डी गावात क्रांतिवीर सांगोली रायण्णा यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

आज बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गोकाक आणि मूडलगी येथील विविध गावात उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण केले.

यावेळी त्यांनी क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या इतिहासाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्यासाठी क्रांतिवीर संगोळी रायण्णानी आपले बलिदान दिले. ते अधिक काळ जगू शकले असते तर ब्रिटिशांना त्यांनी पाणी पाजले असते.Cm sidharamayya

क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांची देशभक्ती अजरामर राहावी, जनतेत त्यांच्या बलिदानाची जागृती राहावी यासाठी आम्ही संगोळी या त्यांच्या जन्मगावी सैनिक शाळा प्रारंभ केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री सतीश जारकीहोळी, मुख्य सचेतक अशोक पट्टण, कर्नाटक प्रदेश कुरुब संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.सन्नक्की आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.