Sunday, November 10, 2024

/

शिवरायांची ‘ती’ मूर्ती तात्काळ उभारावी -‘राष्ट्रवादी’ची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :राजकोट (मालवण) येथील कोसळलेली छ. शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती तात्काळ पूर्ववत उभारण्यात यावी. तसेच मूर्ती कोसळण्यास कारणीभूत दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष ज्योतिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.

राजकोट (मालवण) येथे गेल्या 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदल विभागाच्यावतीने छ. शिवाजी महाराजांची पूर्णकृती मूर्ती बसविण्यात आली होती. या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. सदर मूर्ती काल झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळली.

सदर घटनेस मूर्तीची उभारणी करणारा कंत्राटदार कारणीभूत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच राजकोट येथील शिवरायांची ती मूर्ती तात्काळ पूर्ववत उभारण्यात यावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी महांतेश कोळूचे, अल्ताफ सनदी, शाम मंतेरो, शोहल कित्तूर, गीता जन्नबसण्णावर, अश्विनी हट्टीकर, शिल्पा जेटवाडकर, भारती टोपण्णावर, रूद्रान्ना इराप्पगोळ, भारती खाडे, रेश्मा माळगी, प्रेरणा मडवाळ, रेणुका चौगुला आदिंसह राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.Ncp bgm

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील म्हणाले की, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यामधील पंतप्रधानांनी अनावरण केलेली छ. शिवाजी महाराजांची मूर्ती मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळली. चौथऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे शिवरायांची मूर्ती कोसळण्याची ही घटना अतिशय लाजिरवाणी व संतापजनक आहे. आपल्या देशासह जगभरातील मराठी माणसासह हिंदू बांधवांच्या मनात महाराजांबद्दल अभिमान आहे. महाराजांच्या इतिहासाचे धडे परदेशातही गिरवले जातात. शिवकालीन कारागिरांनी त्याकाळी बांधलेल्या किल्ल्यांचे बांधकाम इतके मजबूत आहे की आजही ते अभेद्य आहेत. मात्र मालवणमध्ये उभारण्यात आलेली शिवरायांची मूर्ती अवघ्या 8 महिन्यात कोसळली ही चिंताजनक बाब आहे. या घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच ती मूर्ती पुनश्च चांगल्या पद्धतीने उभारावी अन्यथा शिवप्रेमी गप्प बसणार नाहीत रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. महाराजांची मूर्ती कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी. तसेच शिवरायांची ती मूर्ती तात्काळ पुनश्च उभारण्यात यावी, अशी मागणी जोतिबा पाटील यांनी केली.

महांतेश कोळुचे याने यावेळी बोलताना मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुनर्रउभारणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांसह येथील स्थानिक आमदार आणि खासदारांना आम्ही करत आहोत. महाराजांच्या मूर्तीची लवकरात लवकर पुनर्रउभारणी करण्याबरोबरच कोसळलेली मूर्ती ज्या कंत्राटदाराने उभारली होती त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी आम्ही केली आहे, असे कोळुचे याने सांगितली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.