Tuesday, December 24, 2024

/

बाल गणेश मंडळाच्या मागणीची दखल; हटविल्या हाय टेन्शन तारा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर गल्ली, शहापूरच्या बाल गणेश उत्सव मंडळाने अलीकडेच एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्या होत्या.

तेंव्हा त्यांनी मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याची आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज रविवारी सदर गल्ली परिसरातील धोकादायक हाय टेन्शन विजेच्या तारा हटविण्यात आल्या.

येत्या श्री गणेशोत्सवापूर्वी आमच्या भागातील स्मार्ट स्मार्ट सिटीची रखडलेली विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे श्री आगमन व विसर्जन मार्गावरील खुली गटारे बंदिस्त करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे बुजवून पथदिपांच्या वीज वाहिन्या व्यवस्थित भूमिगत कराव्यात, अशी मागणी नार्वेकर गल्ली, शहापूर बेळगावच्या बाल गणेश उत्सव मंडळाने गेल्या 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

तसेच त्यांना पुढील आशयाचे निवेदन सादर केले होते. यावर्षी गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबर 2024 पासून साजरा केला जाणार आहे मात्र आमच्या भागातील स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेली रस्ते, गटार आणि भूमिगत वीज वाहिन्या (अंडरग्राउंड वायरिंग) ही विकास कामे अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत.

गेल्या 5 वर्षापासून ही कामे प्रलंबित असून ज्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा हवामान देखील बिघडलेले आहे. त्यामुळे आमची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी संबंधित विकास कामे त्वरेने लवकरात लवकर पूर्ण करावीत. मागील कांही वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन श्री गणेशाच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता.High tenshan wire

मात्र यावर्षी श्रीच्या मूर्ती 12 फुटापेक्षा उंच मोठ्या असणार आहेत. त्यामुळे श्री गणेशोत्सवापूर्वी श्रीमूर्ती आणण्याच्या आणि विसर्जनाच्या मार्गावरील खुली गटारे झाकण्यात यावीत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे बुजवून पथदिपांच्या विद्युत वाहिन्या व्यवस्थितरीत्या भूमिगत कराव्यात ही विनंती.

निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरुवात केली असून आज रविवारी नार्वेकर गल्ली शहापूर परिसरात असलेल्या विजेच्या खांबावरील हाय टेन्शन विजेच्या तारा हटविण्यात आल्या. हेस्कॉम अधिकारी शिवानंद गलगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले. याप्रसंगी बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर नारायण पाटील, कार्याध्यक्ष युवराज विजयकुमार मुरकुंबी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. पद्धतीने धोकादायक हाय टेन्शन विजेच्या तारा हटविण्यात आल्याने अध्यक्ष सागर पाटील यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांचे आभार मानले असून परिसरातील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.