Saturday, December 21, 2024

/

बामणवाडी क्रॉस जवळील अपघातात किणयेचा युवक ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. पिरणवाडी जांबोटी रस्त्यावर बामणवाडी क्रॉस जवळ सदर अपघात झाला आहे.सूरज दीपक पाटील वय 30 रा. किणये असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बेळगांव चोर्ला रस्त्यावरील बामनवाडी क्रॉस जवळ गुरुवारी रात्री 9 च्या दरम्यान गोव्यावरून मालवाहतूक करणारी आयसर गाडी व बेळगांव कडून किणयेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात किणये येथील युवकाचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भयानक झाला होता की मयत सूरज याची गाडी 50 फुटापर्यंत फरफटत गेली होती. त्यानंतर आयचर गाडी एका विद्युत खांबला जाऊन धडकली होती अपघात होताच गंभीर जखमी अवस्थेत सूरजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काही उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.Road accident

मयत सुरज हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचे (MR) काम करत होता गुरुवारी रात्री तो आपल्या किणये या गावी बेळगावहून परतत होता त्यावेळी काळाने त्याच्यावर झडप घातली यात त्याचा मृत्यू झाला. सूरज यांच्या पश्चात वडील ,आई,दोन भाऊ असा परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या त्या अवजड गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

बेळगाव ते किणये दरम्यान या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन अपघात नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत वाहन चालकाकडून व्यक्त होत आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.