बेळगाव लाईव्ह : रेणुकास्वामी खून प्रकरणातील आरोपी प्रदुषला गुरुवारी दुपारी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले.
या प्रकरणातील 14 वा आरोपी प्रदुष हा ब्लँकेट आणि बॅग घेऊन तुरुंगात आला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या बॅगची कसून तपासणी केली. यावेळी त्याला ब्लँकेट आत नेण्यास नकार देण्यात आला. त्याच्या बॅगमध्ये औषधाची बाटली होती. मात्र कारागृह अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ती दिली जाईल, असे सांगितले.
रेणुकास्वामी खून प्रकरणातील सदर आरोपी याआधी बेंगळुरू येथील कारागृहात कैदेत होता. मात्र या प्रकरणातील प्रमुख आरोपी अभिनेता दर्शन याला कारागृहात मिळालेल्या शाही बडदास्त प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना विविध कारागृहात हलविण्यात आले आहे.
यानुसार या प्रकरणातील आरोपी क्रमांक १४ प्रदुष यालाही हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले आहे.