Monday, December 30, 2024

/

प्रदूषण मंडळाचे वरातीमागून घोडे; पीओपी मूर्तींवर बंदी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव नजीक येऊन ठेपला असून मूर्तिकार श्री मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तींचे उत्पादन, विक्री आणि कोणत्याही जलस्त्रोतांमध्ये त्यांचे विसर्जन यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

श्री गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळाकडून दरवर्षी मूर्तिकारांना 6 ते 8 महिन्यापूर्वीच गणरायाच्या मूर्ती बनवण्याचे काम मिळते. त्यानुसार यंदा मूर्तिकार आणि सर्व मूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून मुहूर्तमेढ आणि गणपती मूर्तीच्या स्वागताची तयारी देखील सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्ती व उत्पादनांवर निर्बंध घालण्याचा आदेश बजावून वरातीमागून घोडे घेऊन जाण्याचा प्रकार प्रदूषण मंडळ आणि संबंधित विभागाने केला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा पुढे आला आहे. वन, जैववैविधता आणि पर्यावरण नियंत्रण खात्याचे अधीन सचिव बी. एन. प्रवीण यांनी 15 ऑगस्ट रोजी पीओपी मूर्ती बाबतचा आदेश बजावला आहे.

पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नाही. तसेच मूर्ती बनवताना रासायनिक घटकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणासह नदी, विहिरी, आढ्या काठच्या जनतेच्या आणि जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

यासाठी नदी, नाले, कालवे, विहीर आणि अन्य जलस्त्रोत संरक्षणासाठी रासायनिक मिश्रित पीओपी मूर्तीची निर्मिती, विक्री आणि पुरवठ्यासह त्यांचे पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध घालण्याचा आदेश बजावण्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कळविले आहे.

दरम्यान या आदेशाला अनेक आणि आक्षेप दर्शवला असून  सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ या संदर्भात आवाज उठवणार असल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.