Wednesday, September 18, 2024

/

रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली ‘असा’ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :येत्या श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि या मागणीची व्यवस्थित पूर्तता करण्याऐवजी महापालिकेकडून घिसाडघाईने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले जात असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यावरील खड्डे बेजबाबदारपणे दुरुस्त करण्याचा असाच प्रकार काल रात्री 11:30 -12 वाजण्याच्या सुमारास गणपत गल्ली येथे पहावयास मिळाला. कालवलेले सिमेंट ट्रॅक्टर मधून आणून ते बुट्टीबुट्टीने गणपत गल्ली रस्त्यावरील खड्ड्यामध्ये ओतणे आणि खड्डा व्यवस्थित बुजवला आहे की नाही? हे न पाहता पुढे जाणे असे काम संबंधित कंत्राटदाराकडून काल रात्री केले जात होते.

थोडक्यात खड्डे पडलेल्या रस्त्याचे पॅचवर्क करण्याच्या नावाखाली नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात होता.Pathholes

याबाबत नागरिकांनी जाब विचारला असता “उद्या परत सिमेंट काँक्रेट घालून हे खड्डे व्यवस्थित बुजवणार आहोत” असे सांगत घाईगडबडीने काम उरकून संबंधित कंत्राटदार व कामगारांनी तेथून काढता पाय घेतल्याचे समजते.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार करण्याऐवजी या पद्धतीने निकृष्ट आणि बेजबाबदारपणे केले जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.