Thursday, October 31, 2024

/

नागरिक, कार्यकर्त्यांनी श्रमदानाने केली येळ्ळूर रस्त्याची डागडुजी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:येत्या श्री गणेशोत्सवाप्रसंगी गैरसोय होऊ नये यासाठी येळ्ळूर येथील जागरूक नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी खराब झालेल्या येळ्ळूर रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करून सामाजिक बांधिलकी जपली.

गेल्या कांही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्याची मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना रस्त्यावरून वाहन चालवणे खूपच कठीण जात आहे. कायम वर्दळीचा असणारा हा रस्ता समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी, रिक्षा किंवा चारचाचाकी वाहन एका बाजूला ओढल्यासारखे होते.

त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून गेल्या 2 आठवडाभरात या रस्त्यावर जीवघेणे अपघातही झाले आहेत. देसुर, खानापूर, नंदीहळ्ळी राजहंस गड येथील वाहतूकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणत होत असते. तसेच सध्या पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.

सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले आहे. तथापी पावसामुळे या कामांना विलंब होत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच महत्त्वाचं म्हणजे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर गावातून अनेक गणेश मूर्ती बाहेर जातात, बाहेरूनही मूर्ती गावात आणल्या जातात. त्यावेळी कोणतीही अडचण येऊ नये, संभाव्य धोका टळावा यासाठी आज श्रमदानाने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.Road repair

सामाजिक बांधिलकी जपताना एक जागरूक नागरीक म्हणून ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रा.पं. अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा.पं. सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, रमेश मेनसे, उद्योजक एन. डी. पाटील, प्रसाद कानशिडे मधू नांदुरकर, अनिल सांबरेकर, पृथ्वीराज पाटील, शुभम पठाणे आदित्य हणमंत पाटील, अरुण मुरकुटे, मधू पाटील, आकाश मंगनाईक, बजरंग घाडी दीपक कदम अशा युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने श्रमदानातून आज येळ्ळूर रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्यांचे डागडुजीकरण केले. यावेळी रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद देत मदत केली.

या पद्धतीने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर रस्ता वाहतुकीसाठी सोयीस्कर करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी लवकरात लवकर येळ्ळूर रस्त्याचे दुपदरीकरण करून दोन्ही बाजूने वॉकिंग ट्रॅक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.