बेळगाव लाईव्ह : मुडा घोटाळा, वाल्मिकी घोटाळा यासारख्या प्रकरणात विरोधकांच्या कोंडीत अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजकीय दबाव आणि गोंधळाला न जुमानता सोमवारी बेळगावात येणार आहेत.
सोमवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11-45 वाजता विशेष विमानाने बेळगाव येथील सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून ते बेळगाव जिल्ह्यातील विविध भागांना ते भेट देतील.
सांबरा विमानतळावरून थेट गोकाक तालुक्यातील कौजलगी गावात उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायन्ना मूर्तीचे अनावरण आणि किल्ल्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या होणार आहे.
कौजलगी येथील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री गोकाक तालुक्यातील कळ्ळीगुद्दी गावात क्रांतिवीर संगोळी रायन्ना मूर्तीचे अनावरण करणार आहेत. यानंतर यादवाड येथील मूडलगी येथील क्रांतिवीर संगोळी रायन्ना मूर्तीचे लोकार्पण करणार आहेत.
त्यानंतर कल्लोळ्ळी गावात क्रांतिवीर संगोळी रायन्ना मूर्तीला अभिवादन करून पुन्हा सांबरा विमानतळावर पोहोचून आणि बंगळुरूला रवाना होणार आहेत.