Friday, November 1, 2024

/

उद्या शहराच्या दक्षिण विभागातील वीज खंडित

 belgaum

बेळगाव लाईव्ह:अवघ्या कांही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 25 रोजी शहराचा विशेषत: दक्षिण भागाचा विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम विभागाने कळविले आहे.

बेळगाव दक्षिण विभागातील टिळकवाडी, शास्त्रीनगर, नानावाडी या भागातील विद्युत पुरवठा बंद राहणार नाही. मात्र संपूर्ण शहर विभाग, उपनगरं, शिवाजीनगर,

शिवबसवनगर, सदाशिवनगर वीरभद्रनगर, वैभवनगर, नेहरूनगर, शाहूनगर, अंजनेयनगर, श्रीनगर, इंडाल विभाग, गॅंगवाडी अशा संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी उद्या सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खंडित राहणार आहे. या खेरीज मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी

सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शहराच्या उत्तर भागाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.