Sunday, November 10, 2024

/

बेळगाव महापालिका सरकार नियुक्त नगरसेवकांची नियुक्ती

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या सरकार नियुक्त नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन माजी नगरसेवकांची सरकार नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव उत्तर आणि दक्षिण मधून दोन तर ग्रामीण मधून एका नगरसेवकाची सरकार नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश बजावला आहे.

दक्षिण मधून काँग्रेस कडून माजी नगरसेवक रमेश सोंटक्की डॉ दिनेश नाशिपुडी यांच्यासह मोहम्मद सलीम सिद्राय मेत्री मुश्ताक मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश सोनटक्की यांनी याआधी बेळगाव महापालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषवले होते याशिवाय डॉ दिनेश नाशिपुडी यांनी या अगोदर मागील सभागृहात एक सक्रिय नगरसेवक म्हणून भूमिका बजावली होती.

या दोन नगरसेवकांच्या सभागृहातील एन्ट्रीमुळे आता काँग्रेसच्या रणनीतीत बऱ्यापैकी फरक पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सदर नियुक्त्या मधून ग्रामीण दक्षिण उत्तर कार्यकर्त्यात समन्वय साधून पद देण्यात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.