बेळगाव लाईव्ह : ओमान या देशात झालेल्या कार अपघातामध्ये मूळचे गोकाकचे असलेल्या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याच्या गोकाक शहरातील पवन कुमार तहसीलदार पूजा तहसीलदार विजया तहसीलदार आणि आदिषेश बसवराज अशी या घटनेत मयत झालेल्यांची नावे आहेत.
ओमान मधील सलाला शहरातून मस्कतला जात असते वेळी हायमा शहरा जवळ हा अपघात घडला आहे सध्या हायमा येथील इस्पितळाच्या शवगारात या चौघांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत.
या मयातांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी खासदार इरान्ना कडाडी प्रयत्न करत असून त्यांनी परराष्ट्र खात्याकडे अशी मागणी केली आहे.