बेळगाव लाईव्ह : देसूर ग्राम पंचायत मध्ये 15 दिवस आधी गावातील कामाची माहिती मिळविण्यासाठी निवेदन दिले होते.
त्या निवेदनामध्ये देसूर गावामध्ये ग्राम पंचायतने केलेल्या कामाची माहिती तसेच देसूर गावातील गटार स्वच्छ करण्यासाठी 472000 रुपयांचा खर्च केलेला आहे.
त्याची माहिती व इतर निधी -2 ,सप्लाय बिल ,घर नोंदणी केलेली रक्कमची माहिती मिळवण्यासाठी गावामधील युवक, गावकरी,माजी ग्राम पंचायत सदस्य यांनी निवेदन दिले. परंतु ग्राम पंचायतीकडून त्याबद्दल माहिती देण्यात आली नाही.
त्यासाठी गावातील युवक, गावकरी, माजी ग्राम पंचायत सदस्य ५ ऑगस्ट रोजी प्रथम तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीला निवेदन देणार आहे. यासंदर्भातील माहिती न दिल्यास ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.
देसूर गावातील गटार स्वछ करण्यासाठी तसेच इतर विकासकामांसाठी केलेल्या खर्चाची माहिती ७ दिवसात देण्यात यावी अन्यथा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.