बेळगाव लाईव्ह : श्री गणपती हि बुद्धीची देवता म्हणून पुजली जाते. चौदा विद्यांचा अधिपती असणारा श्री गणपती याची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. कधी मनातले हितगुज तर कधी आपले लाडके आराध्य अशा विविध पद्धतीने प्रत्येकजण गणपतीची पूजा करतो.
मात्र आपण शिकलेल्या कलेचा योग्य वापर करून, अर्थार्जन आणि कला या दोन्ही उद्देशातून ढोर गल्ली वडगाव येथील नम्रता श्रेयकर या तरुणीने आकर्षक अशा गणेशमूर्ती साकारून आपल्या शिक्षणाचा, कलेचा आणि आई – वडिलांच्या संस्कारांचा उद्धार केला आहे.
ढोर गल्ली, वडगाव येथे राहणाऱ्या नम्रता श्रेयकर या तरुणीने फाईन आर्ट या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला असून ‘सुखकर्ता कला केंद्र’ या नावे सदर तरुणीचे फेसबुक पेज आहे.
मध्यमवर्गीयांना माफक दरात श्री गणेश मूर्ती उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून मूर्ती बनविण्याचा आपण संकल्प केला असून यंदा ५० हुन अधिक मूर्ती साकारण्यात आल्याचे नम्रता श्रेयकर या तरुणीने बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.
हल्ली प्रत्येक क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत, या अनुषंगाने प्रत्येक मुलीने, महिलेने आपापल्या क्षेत्रात प्रगती करावी असे मतही तिने व्यक्त केले.
कलेला वयाचे बंधन नसते, कोणत्याही वयात माणसाच्या अंगात जर कला असेल, श्रद्धा असेल आणि कलेप्रती जागृत असेल तर अशा पद्धतीची कलाकृती नक्कीच निर्माण होतात यात शंका नाही