फेसबुक फ्रेंड्स सर्कल धावून गेले रुग्णाच्या मदतीला

0
1
Darekar
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सेवाभावी सामाजिक संस्था असलेल्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्यावतीने आजवर अनेक रुग्णांना सहकार्य करण्यात आले आहे.

अत्यंत जोखमीच्या काळात धावून जाणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आजवर अनेकांचे जीव वाचवून समाजासमोर समाजसेवेचा आणि माणुसकीचा आदर्श ठेवला असून आजदेखील एका अतिदक्षता विभागातील रुग्णाला अवघ्या ३० मिनिटात रक्त उपलब्ध करून दिले.

मोहम्मद एम मुल्ला (वय 30) या रुग्णांसाठी ए – निगेटिव्ह रक्ताची अत्यंत गरज होती. सदर रुग्ण हिमोफिलिया आजराने ग्रस्त असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते.Darekar

 belgaum

बेळगावमधील अयोध्यानगर येथील प्रभा हॉस्पिटल येथे त्याच्यावर डॉ. देवदत्त देसाई यांच्या मार्फत उपचार सुरु होते. यादरम्यान रुग्णाला तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कल ला देण्यात आली. यावेळी तातडीने या गोष्टीची दखल घेत फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर आणि स्वयम पाटील यांनी रक्त उपलब्ध करून दिले.

त्यांच्या या कार्यामुळे सदर रुग्णाला पुन्हा जीवदान मिळाले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. कोणालाही अशापद्धतीने अडचणी निर्माण झाल्यास, आपत्कालीन परिस्थितीत 9986809825 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.