Sunday, November 24, 2024

/

श्रीकृष्ण कथा महोत्सवात भक्ती रसामृत महाराज

 belgaum

बेळगाव लाईव्ह -“वारणाव्रत येथील महालात सर्व पांडव जळून खाक झाले असा सर्वांचा समज होता पण तसे झाले नसल्याचे धृतराष्ट्राला समजले आणि त्याने पुन्हा पांडवांना बोलवून आपल्याकडे ठेवून घेतले”. अशी माहिती इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी श्रीकृष्ण कथा महोत्सवात बोलताना चौथ्या दिवशी दिली.

इस्कॉनच्या श्री राधा गोकुलानंद मंदिरात सुरू असलेल्या महोत्सवात ते म्हणाले की, “त्यावेळी कौरव हस्तीनापुरात राहत होते.पांडवांनी आपल्याला राज्याचा काही भाग मिळावा, निदान प्रत्येक भावाला एक एक गाव तरी मिळावे अशी अपेक्षा धृतराष्ट्राकडे केली. तत्पूर्वी दुर्योधन हा राजा होऊन बसला होता आणि त्याने पांडवाना पाच गावे काय तर सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा देत नाही अशी दांभिक गर्जना केली होती.

युद्ध करत बसण्यापेक्षा आपण शांतपणे राहावे यासाठी पांडवानी जी पाच गावे मागितली होती त्यामध्ये खांडवप्रस्थ, सुवर्ण प्रस्थ, पांडू प्रस्थ ,व्याघ्रप्रस्थ आणि तिलपथ यांचा समावेश होता. असे असले तरी शेवटी धृतराष्ट्रांनी त्यांना खांडवप्रस्थ हे नगर दिले.

पांडवानी त्याचे नंदनवन करून त्याचे इंद्रप्रस्थ मध्ये रूपांतर केले. पांडव इंद्रप्रस्थ मध्ये राहिले असल्याचे समजताच भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थला गेले. त्यांनी सर्वांची भेट घेतली .तेथे त्यांनी राहावे असा पांडवानी अग्र धरला त्यामुळे तेथे ते अनेक दिवस राहिले. तसा अर्जुन हा त्यांचा विशेष मित्र होता.
एक दिवस यमुनेच्या तटावर अर्जुन व श्रीकृष्ण बसले असताना तेथे एक तरुणी तपस्या करीत असल्याचे त्यांना जाणवले.Bhakti rasamrit maharaj

त्या तरुणीची चौकशी करण्याची सूचना कृष्णाने अर्जुनाला दिली तेव्हा आपण सूर्यदेवाची कन्या असून आपले नाव कालिंदी आहे आणि पती म्हणून भगवान श्री विष्णूंना प्राप्त करण्यासाठी मी तपस्या करीत आहे. माझी तपस्या पूर्ण होईपर्यंत मी इथून हलणार नाही असा पण तिने केला असल्याचे अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितले आणि त्यानंतर श्रीकृष्ण आणि कालिंदी यांचा विवाह झाला. अशाप्रकारे कालिंदी ही चौथी रानी भगवंतांची पत्नी झाली.

आजही शेकडोभक्तानीं या कृष्ण कथेचा लाभ घेतला. हा महोत्सव आणखी तीन दिवस चालणार असून सोमवारी जन्माष्टमी दिवशी त्याचा समारोप होणार आहे .
दि. 27 ऑगस्ट रोजी इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन साजरा केला जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.