बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना उपनेते नितीन बानुगडे -पाटील यांच्यावरील खटल्याची आज सोमवारी सकाळी खानापूर न्यायालयात सुनावणी होती. यावेळी न्यायालयाने खटल्याच्या पुढील सुनावणीची तारीख 18 सप्टेंबर 2024 अशी दिली.
खानापूरमध्ये गेल्या 2006 साली झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात कदम आणि बानुगडे -पाटील या उभयतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयातील आज युक्तिवादानंतर सदर खटल्याची पुढील सुनावणीची तारीख 18 सप्टेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. सदर खटल्यात माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना उपनेते नितीन बानुगडे -पाटील यांच्यावतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार व ॲड. हेमराज बेंचन्नावर काम पाहत आहेत.
आजच्या सुनावणीप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील या नेत्यांसह खानापूर म. ए. समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खानापूर वकील संघटनेच्या वतीने देखील दोन्ही शिवसेनेचे नेत्यांचा सत्कार करण्यात आला.