बेळगाव लाईव्ह:व्हीटी-बीबीबी म्हणून नोंदणीकृत सेसना 152 विमान अपघाताच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानांची देखभाल करणाऱ्या भोपाळ येथील मेसर्स इंटरनॅशनल एअरक्राफ्ट सेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा परवाना रद्द केला आहे. याच्याशी संवर्धने टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट असलेल्या बेळगाव एव्हिएशन अँड स्पोर्ट्स एंटरप्रायझेसचा कांही संबंध नाही, असे सदर संस्थेचे
उत्तरदायी व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार स्वामी यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.
डीजीसीएच्या मते सेसना 152 हे विमान देखभालीनंतर त्याच्या पहिल्या उड्डाणावर होते. ज्यात भोपाळ येथील मेसर्स इंटरनॅशनल एअरक्राफ्ट सेल्स प्रा. ली. द्वारे संचालित डीजीसीए-मंजूर सुविधेवर सर्व्हिस केलेले ओव्हरहॉल्ड इंजिन होते. मेसर्स बेळगाव एव्हिएशन अँड स्पोर्टस एंटरप्रायझेसच्या सी-152 विमाननच्या घटनेनंतर गेल्या 11 ऑगस्ट 24 रोजी गुना, मध्य प्रदेश येथे उपरोक्त विमान क्रॅश-लँड होण्याची घटना घडली.
अपघातानंतर डीजीसीएने देखभाल संस्थेचे एक विशेष ऑडिट सुरू केले आणि देखभाल मानकांमधील महत्त्वपूर्ण त्रुटी उघड केल्या. ज्यामुळे मेसर्स इंटरनॅशनल एअरक्राफ्ट सेल्स प्रा. ली.चा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान काही प्रसिद्धी माध्यमांनी मेसर्स बेळगाव एव्हिएशन अँड स्पोर्टस एंटरप्रायझेसचा परवाना रद्द झाल्याचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे.
गुना येथील अपघातानंतर डीजीसीए ने मेसर्स इंटरनॅशनल एअरक्राफ्ट सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. बेळगाव एव्हिएशन आणि स्पोर्ट्स एंटरप्रायझेसचा नाही. मेसर्स बेळगाव एव्हिएशन अँड स्पोर्ट्स एंटरप्रायझेस हे संवर्धने टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट सांबरा विमानतळ येथे स्थित आहे, गुना मध्यप्रदेश येथे नाही.
तसेच मेसर्स शशिब फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल गुना, मध्य प्रदेश येथे स्थित आहे. मेसर्स बेलगावी एव्हिएशन अँड स्पोर्ट्स एंटरप्रायझेसने आजपर्यंत फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यतेसाठी अर्जही केलेला नाही.
त्यामुळे त्यांच्या बाबतीत परवाना निलंबन किंवा रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे संवर्धने टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट असलेल्या बेळगाव एव्हिएशन अँड स्पोर्ट्स एंटरप्रायझेसचेउत्तरदायी व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार स्वामी यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.